पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण येथे हायड्रो सिस्टीम नादुरुस्त झाल्याने जलसंपदा विभागाकडून धरणातून सोडण्यात येणा-या पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आज (दि.१८) दिवसभर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे.
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर २३ निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. पवना धरण येथील हायड्रो सिस्टीम नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून धरणातून सोडण्यात येणा-या पाण्याचे प्रमाण कमी आहे.
परिणामी, आज (दि.१८) दिवसभर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य व जपून करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.