चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची चौथी फेरी संपत आली आहे. चौथी फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांनी २४२९ मतांची आघाडी घेतली आहे. चौथ्या फेरी अखेरीस जगताप यांना १३,८८० एवढी मते मिळाली आहेत. सध्या रावेत, भोईर नगर, प्रेमलोक पार्क येथील मतमोजणी सुरू आहे.
या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्यात टक्कर पहायला मिळत आहे. तर अपक्ष राहुल कलाटे या निवडणुकीत मागे पडताना दिसत आहे.
पहिली फेरी
अश्विनी जगताप – ४१६७
नाना काटे – ३६४८
राहुल कलाटे – १६७४
दुसरी फेरी
अश्विनी जगताप – ७९९६ (६४७ आघाडी)
नाना काटे – ७३४९
राहुल कलाटे – ३०४६
तिसरी फेरी
अश्विनी जगताप – ११२२२ (१७८७ आघाडी)
नाना काटे – ९४३५
राहुल कलाटे – ३९४२
तिसरी फेरी
अश्विनी जगताप – १३८८० (२४२९ आघाडी)
नाना काटे – ११३५१
राहुल कलाटे – ४५९९