पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने दि.२४ ते ३१ मार्च या कालावधीत विशेष मोहिम राबवली. या मोहिमेत विरुद्ध दिशेने प्रवास करणारे, ट्रिपल सीट वाहन चालविणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सहायक पोलिस आयुक्त सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे, हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी क्षेत्रे आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे इथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो.

रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने तसेच ट्रिपल सीट वाहने चालविल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. या अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत दि.२४ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे ३१३ वाहन चालक तसेच ट्रिपल सीट वाहन चालवणारे १५८ वाहनचालक यांच्यावर भारतीय दंड संहिता २७९ नुसार एकूण ४७१ गुन्हे दाखल करण्यात आले. यापुढील काळात देखील अशा प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहायक आयुक्त सतीश माने यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group