पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील थोर महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून त्यांना अभिवादन करून मारुती जाधव यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते व वायसीएम विभागातील रुग्णवाहिका वाहन चालक मारुती जाधव यांनी वाढदिवसानिमित्त अनोखा स्तुत्य उपक्रम राबविला. पिंपरी चिंचवड शहरांमधील सर्व थोर मोठे महापुरुष यांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून अभिवादन केले.
हा अनोखा उपक्रम मारुती जाधव यांनी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमामध्ये सर्व मित्र परिवार, कार्यकर्ते यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मारुती जाधव यांच्या या उपक्रमामुळे सर्व शहरातून त्यांचे कौतुक होत आहे.
हा अभियान पूर्ण करण्यासाठी विशाल गरड, अक्षय ओहोळ, सेफ खान, सागर म्हस्के, कुणाल पळसकर, असलम यांनी विशेष सहभाग घेतला.