पिंपरी-चिंचवडमधील ‘राष्ट्रवादी’ अजितदादांसोबत, शहरभर झळकले फ्लेक्स
राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार यांचा गट अशी दुफळी पडल्याचं चित्र आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी शरद पवार यांना पाठींबा दिला असताना पिंपरी चिंचवडमध्ये चित्र वेगळं आहे. पिंपरी चिचवडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला पाठींबा दर्शविला आहे. अजितदादांच्या समर्थनात शहरातील प्रत्येक चौकात तसे फ्लेक्स झळकले आहेत. या फ्लेक्समध्ये राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, आमदार सुनिल शेळके, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, अभय मांढरे यांचे फोटो वापरण्यात आले आहेत.