पिंपरी (Pclive7.com):- डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठाचा १४ वा पदवीप्रदान समारंभ उद्या सोमवार (दि.१४) सकाळी ११ वाजता पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहतील.

या कार्यक्रमात कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, रमाय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स क्वालिटी अॅश्युरन्स अँड एक्सलन्स सेलचे प्रमुख सल्लागार डॉ. पी. एन. राजदान यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
विद्यार्थ्यांचा पदवीप्रदानात समावेश..
प्रावीण्य संपादन केलेल्या ३३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, विद्याशाखेतील ४०९५ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये १४ पीएच.डी., ३०१५ पदव्युत्तर पदवी, २०५५ पदवी व ११ पदविका ८ शाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.





















Join Our Whatsapp Group