पुणे (Pclive7.com):- मैत्रीपूर्ण संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीपू्र्ण संबंध होते. याच मैत्रीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
इतकंच नाही, तुझ्या पतीला फोटो दाखवेल, अशी धमकी दे आरोपीने पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला. २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. यादरम्यान आरोपीने पीडितेला धमकावून १० लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे.
दरम्यान, आरोपीकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून पीडित नगरसेविकेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे.