पिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या (गुरुवार दि.०२) पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत दोन तासांचा हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान पुण्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येईल. आयटीएमएस अंतर्गत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

या ब्लॉकवेळी सोमाटणे फाटाजवळ ही गॅन्ट्री बसविण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून असे ब्लॉक घेतले जात आहेत. या प्रकारच्या कामांसाठी पुढील काही महिने असेच ब्लॉक घेतले जाणार आहेत. ब्लॉकवेळी सर्व वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल. या दरम्यान प्रवाश्यांनी सहकार्य करावे असे आवाहन एमएसआरडीसी आणि महामार्ग पोलिसांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group