पिंपरी (Pclive7.com):- तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांचा पुर्नवसनाचा प्रश्न अद्याप पूर्णत: सुटलेला नसतानाच संबंधित लाभार्थ्यांना आरक्षित केलेल्या भूखंडावर अतिक्रमण सुरू झाले आहे. मात्र, याकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.

स्पाईन रस्ता बाधितांसाठी 126 रहिवाशांच्या पुर्नवसनासाठी आवश्यक असलेला पेठ क्रमांक 11 येथील भूखंडावर जागा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी अद्याप लाभार्थ्यांनी बांधकामे सुरू केलेली नाहीत. तत्पूर्वीच या भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
स्पाईन रस्ता विकसित करत असताना त्रिवेणीनगर चौकातील काही घरे बाधित होत आहेत. त्या घरांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित होती. दरम्यान, महापालिका प्रशासनाने लाभार्थ्यांना 1250 स्के.मी.भूखंडाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू केली. अद्याप काही बाधितांना तांत्रिक अडचणींमुळे काहीना जागा तर बऱ्याच जणांना अलॉटमेंट लेटर देखील मिळालेले नाही. असे असताना मोकळ्या भूखंडावर होणारे अतिक्रमण प्रशासन रोखणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रशासनाची बघ्याची भूमिका…
लाभार्थ्यांना आरक्षीत जागेवर पत्राशेडचे काम बेकायदेशीपणे सुरू आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासनाने टाळाटाळ केली जात आहे. महापालिका प्रशासनाने वाटप केलेल्या भूखंडावर अतिक्रमण होत आहे. प्रकल्पबाधित नागरिकांना दिलेल्या जागांवर अतिक्रमण होत असेल आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेत असेल, तर दाद कुणाला मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.






















Join Our Whatsapp Group