पिंपरी (Pclive7.com):- मुंबई-पुणे दरम्यान असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक आज (मंगळवार दि.१२) दुपारी बारा ते दोन या वेळेत घेतला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कुसगाव ढेकू गाव किलोमीटर ५६/९०० व ओझर्डे ट्रॉमा केअर सेंटरजवळ किलोमीटर ७४/९०० येथे पुणे वाहिनीवर गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत या लांबीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुणे दिशेला वळविण्यात येणार आहेत.
तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी दोन वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.























Join Our Whatsapp Group