पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन व लायन्स क्लब ऑफ रहाटणी यांचे संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवडमधील १४ वर्षांखालील शालेय मुलांसाठी क्रिकेट स्पर्धा आज पासून सुरू झाली आहे. आज दि.१२ ते २० डिसेंबर २०२३ च्या कालावधीत “अचीवर क्रिकेट मैदान”, रावेत येथे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील, शालेय स्तरावर “क्रिकेट” या खेळाचा विकास व्हावा व नवोदित खेळाडूंना उत्तम स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी व त्यातून त्यांचे भविष्य घडावे यासाठी प्रथमच “पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या” माध्यमातून आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे “पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल यांनी सांगितले. या स्पर्धेत एकूण सोळा संघानी भाग घेतला असून ही स्पर्धा बाद पद्धतीने होईल.
या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक- रुपये ११०००/- व चषक, द्वितीय पारितोषक- रुपये ७०००/- व चषक, तृतीय पारितोषिक रुपये ४०००/- व चषक, चतुर्थ पारितोषिक- चषक असे आहे; याशिवाय उत्कृष्ट सामनावीर, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर असे पारितोषिके खेळाडूंसाठी जाहीर करण्यात आलेली आहेत. भविष्यात शालेय स्पर्धा वय गट १७ व १९ वर्षांखालील मुलामुलींसाठी घेण्यात येणार आहेत. याकरिता जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे व पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी केले आहे.
Tags: पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनरावेतमध्ये १४ वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धालायन्स क्लब ऑफ रहाटणी
























Join Our Whatsapp Group