खासदार दानिश अली म्हणाले, “तानाशाही नहीं चलेगी” अशा घोषणा हे दोघे देत होते. प्राथमिक माहितीनुसार म्हैसूरचे कोणीतरी खासदार आहेत त्यांच्या पासवर हे दोघे प्रेक्षक गॅलरीपर्यंत आले होते. या खासदाराला चौकशीसाठी बोलावलं आहे.
नेमकं काय घडलं?
हे दोन जण सभागृहात धावत असताना खासदारांनी त्यांना पकडलं. त्याआधी या दोघांनी बूटातून काहीतरी काढलं आणि सभागृहात धूर पसरू लागला. त्यांनी स्मोक कॅनचा वापर केला असावा असं सांगितलं जात आहे. त्याचवेळी खासदारांनी या दोघांना पकडून चोप दिला. त्यापैकी एकाचं नाव सागर असं सांगितलं जात आहे. म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या मदतीने या दोघांनी प्रेक्षक सभागृहाचा पास बनवून घेतला होता. दरम्यान, सभागृहात हा प्रकार सुरू असताना संसदेच्या बाहेर एक महिला घोषणा देत होती. या महिलेलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
२००१ साली आजच्याच दिवशी भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे अनेक खासदारांनी आजच्या घटनेलाही संसदेवरचा हल्ला म्हटलं आहे.
























Join Our Whatsapp Group