मुंबई (Pclive7.com):- मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या चित्रपटांचं चित्रिकरण करत होता, ते चित्रीकरण संपवून जेव्हा तो घरी आला तेव्हा ही घटना घडली. वेलकम टू जंगल सिनेमाच्या चित्रीकरणानंतर ४७ वर्षीय श्रेयस तळपदे घरी आला. त्याने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर मुंबईतल्या अंधेरीमध्ये असलेल्या बेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचंही समजतं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्रेयस तळपदे हा दिवसभर चित्रीकरण करत असताना एकदम व्यवस्थित होता. त्याने चित्रीकरणही व्यवस्थित आटोपल. वेलकम टू जंगल या सिनेमाचं चित्रीकरण करताना तो हास्यविनोदही करत होता. एक दोन अँक्शन सिनही त्याने शूट केले. मात्र तो घरी आला तेव्हा त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने त्याच्या पत्नीला ही बाब सांगितली. ज्यानंतर ती त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागली. त्याचवेळी त्याला चक्कर आली. सद्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
























Join Our Whatsapp Group