पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) कासारवाडी येथे (दि.१४) रोजी ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. या ग्रंथालयामध्ये शैक्षणिक सामाजिक, साहित्यिक कथा कादंबऱ्या, तसेच आयटीआयच्या दृष्टीने प्रत्येक व्यवसायानुसार संदर्भ पुस्तके ठेवण्यात आलेली असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. हे ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क उपलब्ध असणार आहे.
ग्रंथालयाच्या उद्घाटना प्रसंगी संस्थेचे प्राचार्य ज्योत सोनवणे सर, तसेच निदेशक सिद्धार्थ कांबळे, मनसरा कुमावणी, वंदना चिंचवडे, हेमाली कोंडे, सोनाली नीलवर्ण, बबीता गावंडे, पुनम गलांडे, भांडारपाल मोहन कुदळे, वरिष्ठ लिपिक संगीता पथवे, तसेच ह क्षेत्रीय कार्यालयातील माधुरी चव्हाण, सुधीर कोळी तसेच संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
संस्थेच्या प्राचार्यांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांच्याकडे पुस्तके उपलब्ध असतील त्यांनी संस्थेमध्ये आणून द्यावीत. जेणेकरून त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होऊ शकेल.
पुस्तके देण्याकरता संपर्क क्रमांक. – 7722010720/9518772678.






















Join Our Whatsapp Group