पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगावात वाघेरे चाळ नजिक एका पंचवीस ते तीस वयोगटातील महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह रविवारी रात्री उशिरा (दि.१७) आढळला. या घटनेमुळे पिंपरीगावात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंपरीगावात वाघेरे चाळी जवळ एका महिलेचा मृतदेह आढळला. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पिंपरी पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
महिलेच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर समजणार आहे. दरम्यान, प्रथमदर्शनी हा घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पार्लर व्यवसायात ही महिला काम करीत असल्याची माहिती मिळत असून, महिन्याभरापूर्वी ती या भागात राहायला आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने पिंपरीगाव परिसरात खळबळ उडाली आहे.