पिंपरी (Pclive7.com):- पुनावळे येथील कचरा डेपोला आम्ही सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही प्रखर विरोध दर्शवला होता. दरम्यान, कचरा डेपोसाठी जागेच्या मोजणीस आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनादेखील आम्ही माघारी पाठवून दिले. स्थानिक नागरिक आमच्यासोबत असल्यामुळे शासनाला कचरा डेपोच्या प्रकल्पासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नाही. त्यामुळे कचरा डेपो रद्दचे श्रेय पुनावळेकरांचेच असल्याचे मत माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, पुनावळे येथील कचरा डेपो किती हानिकारक आहे, याबाबत चर्चा करण्यासाठी पुनावळे परिसराचे लोकप्रतिनिधी म्हणून राहुल कलाटे यांनी मागील पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. दोन्ही मंत्र्यांसोबत डेपो रद्द करण्याबाबत सविस्तरपणे चर्चा केली होती. त्या वेळी संबंधित मंत्र्यांनी कचरा डेपो रद्द करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार, त्यांनी आपले शब्द खरे ठरवीत विधान परिषदेत कचरा डेपो रद्दची घोषणा केल्याचे कलाटे यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group