लोणावळा (Pclive7.com):- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. बोरघाटात १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्याकडे जाणारी वाहतूक खंडाळा घाटात रखडली जात आहे. त्यामुळे कार आणि मालवाहतूक चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात १० किलोमीटर लांबच्या-लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी पुण्याकडे जाणारी वाहतूक रखडली आहे. तसेच, अडोशी टनेलच्या अगोदरपासून अमृताजन ब्रिजपर्यंत आणि पुण्याच्या दिशेला खंडाळाकडे जाताना १० किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली होती.
शनिवार, रविवारी आणि नाताळ अशी सलग सुट्टी आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालये, सरकारी कार्यालयाना सुट्ट्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शनिवारी (२३ डिसेंबर) सकाळपासून वाहतूक कोंडी होत आहे.