पिंपरी (Pclive7.com):- थर्टी फर्स्ट जोरदार साजरा करत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ३२२ जणांना पोलिसांनी कारवाईचा दंडुका दाखविला. मद्यधुंद होऊन नववर्षाचे स्वागत करणाऱ्या या तळीरामांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

नववर्ष स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. यात हॉटेलसह मॉल, बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रविवारी (दि.३१) सायंकाळपासून मोठा बंदोबस्त तैनात केली होता. बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलिस रस्त्यावर उतरले होते.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत होता. स्थानिक पोलिस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून गस्त घालण्यात आली. तसेच शहरात ३० ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. नववर्षाचे स्वागत करताना रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवरही कारवाई केली.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून मुख्य चौक, अंतर्गत रस्ते तसेच महामार्गावर ठिकठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. पोलिस आयुक्तालयांतर्गत हॉटेल, ढाब्यांसह विविध ४७३ आस्थापनांची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली.
पोलिसांकडून करण्यात आलेली दंडात्मक कारवाई..
ड्रंक अँड ड्राईव्ह – 322
आरोपी चेकिंग – 415
वाहने चेकिंग – 2425
अवैध धंदे कारवाई -10
आस्थापना चेकिंग -473
अवैध धंदे कारवाई मधील जप्त मुद्देमाल – 2,09,875
वाहनांवर केलेल्या कारवाईचे दंडाची रक्कम – 20,60,800/-























Join Our Whatsapp Group