पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन व लायन्स क्लब रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या १४ वर्षाखालील लायन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत एसएनबीपी (मोरवाडी) संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचा अंतिम सामना आरएसपी (दिघी) येथे झाला.

स्पर्धेचा धावफलक खालीलप्रमाणे:-
एसएनबीपी (मोरवाडी) २०षटकांत ४ बाद १६९ (आयुष भावसार ३०, दीप पाटील ७५, अथर्व काळे ४५, सिद्धार्थ पटेल २/३६, अभिराज देशमुख १०/१
एसएनबीपी (रहाटणी) १८.२षटकांत सर्वबाद १२४
(अभिराज पारखे३७, तेजस संघवी १७ पूर्व पटेल ३/१०, अथर्व काळे २/२१)

या स्पर्धेत प्रथम क्रमांक एसएनबीपी स्कूल (मोरवाडी) यांनी पटकावला. या संघाला रोख रक्कम रुपये ११,००० व लायन्स ज्युनियर करंडक देऊन गौरविण्यात आले. एसएनबीपी स्कूल (रहाटणी) यांनी द्वितीय क्रमांक मिळवत रोख रक्कम रुपये ७,००० व लायन्स ज्युनियर करंडकाचे मानकरी ठरले. तृतीय क्रमांक जीजी इंटरनॅशनल स्कूल यांना रोख रक्कम रुपये ५००० व चषक आणि चतुर्थ क्रमांकाचा चषक गोदावरी हिंदी विद्यालय यांना मिळाला.
या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज :
शादाब पाशा (गोदावरी हिंदी विद्यालय)
उत्कृष्ट गोलंदाज
पूर्व पटेल (एसएनबीपी मोरवाडी)
उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू दीप पाटील (एसएनबीपी मोरवाडी)
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ लायन्स क्लबचे अध्यक्ष अमोल दापोरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी पिंपरी चिंचवड असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे, अरुण जागडे, मुकेश गुजराथी सभासद हर्ष नायर, शिरीष हिवाळे, राम कृष्ण मंत्री, प्रमोद भोंडे, डाॅ. जयश्री कोतवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव राजू कोतवाल यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत संजय शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश गुजराथी यांनी केले.
























Join Our Whatsapp Group