पिंपरी (Pclive7.com):- केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूल कृष्णानगर ब्रांच व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ब्रांच मधील चिमुकल्यांनी उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलमध्ये भाग घेतला होता. त्यांच्यासोबत पालकांनीही मनमुराद आनंद घेऊन स्नेहसंमेलमध्ये एक नवचैतन्य निर्माण करून दिले होते. हिंदी मराठी इंग्रजी देशभक्तीपर गीते अशा वेगवेगळ्या गाण्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून केंब्रिज इंटरनॅशनल प्री स्कूलचे चेअरमन धनंजय वर्णेकर सर, सहायक आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका अण्णा बोदडे, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे तसेच माजी महापौर अपर्णाताई डोके, सुरेश भोईर, सोनाली कुटे, अमोल काळे, नरेश टिळेकर, नम्रता जवंजाळ व स्मिता मॅडम उपस्थित होते.
तसेच कृष्णानगर ब्रांचचे डायरेक्टर सौ. कीर्ती मारुती जाधव व श्री. मारुती गणपत जाधव यांनी आभार व्यक्त केले.
























Join Our Whatsapp Group