पुणे (Pclive7.com):- पुणे शहर पोलीस दलातून हळहळ व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे. पुणे शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शहर पोलिस दलात शोककळा पसरली आहे.
धुमाळ पुण्यातील कात्रज परिसरात वास्तव्यास होते. १५ जानेवारी रोजी पाय घसरून तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले होते. त्यांच्या पायाला आणि बरगड्यांना फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्यावर भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर साध्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.
परंतु प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास धुमाळ यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
























Join Our Whatsapp Group