दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या परिक्षांसाठीही हॉल तिकीट महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना बुधवार ३१ जानेवारी २०२४ पासून हॉल तिकीटं डाऊनलोड करता येणार आहे. सर्व माध्यमिक शाळांच्या मार्च २०२४ च्या परीक्षेची प्रवेशपत्रे म्हणजेच हॉल तिकीटं ऑनलाइन डाऊनलोड करता येतील. बोर्डाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगिन’मध्ये हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे.
या कालावधीत होणार परीक्षा..
बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ या दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या काळात घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे.
























Join Our Whatsapp Group