पिंपरी (Pclive7.com):- जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ दत्तात्रय बेनके (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र आमदार अतुल बेनके, डॉ. अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज (दि.१२) सकाळी ९ ते १२ या वेळेत नारायणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
अंत्यविधी सोमवारी दुपारी ४ वाजता जुन्नरमधील हिवरे बुद्रुक या ठिकाणी होणार आहे. बेनके हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. बेनके यानी जुन्नर विधानसभा मतदार संघातून १९८५ ते २००९ या कालावधीत सलग सहावेळा निवडणूक लढवली होती. त्यातील चार वेळा ते विजयी झाले होते. प्रकृतीमुळे २०१४ पासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.
























Join Our Whatsapp Group