पिंपरी (Pclive7.com):- भोसरीतील शिवसंकल्प मित्र परिवाराकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व योगेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मातृछाया बालआश्रम दिघी येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू प्रत्येक विद्यार्थ्याला एक दफ्तर आणि चार वहा आणि एक कंपास पेटी असे पुर्ण साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी विशेष प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करत असलेले धनंजय खाडे आणि श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक जगदाळे सर आणि शिंदे मॅडम उपस्थित होते.
धनंजय खाडे यावेळी म्हणाले की, आजकालची बरीच तरुण पिढी व्यसनाधीन होऊन वाया गेलेली पाहत आलोय. परंतु सामाजिक क्षेत्रात काम करताना फारसा कोणी बालआश्रम शाळेला मदत करत नाही. परंतु योगेश जाधव आणि शिवसंकल्प मित्र परिवाराकडून खुप चांगले असे विद्यार्थीना शालेय वस्तू वाटप करण्यात आले. त्यात योगेश जाधव यांच्या वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
त्यानंतर श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक जगदाळे सर म्हणाले की, आज जे वर्गात सांगत होतो आपण एखाद्या मदत केली पाहिजे तर मला ते तुमच्या माध्यमातून दिसत आहे. तसेच माझे विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या हातून अजुन चांगलें सामाजिक कार्य घडो ही शिवरायांच्या चरणी प्रार्थना. शिंदे मॅडम म्हटल्या की, या आश्रमातील मुलांना शालेय वस्तूंची गरज असते हे लक्षात आल्यावर त्यांना सढळ हाताने मदत केल्याबद्दल आनंद झाला आहे.
यावेळी श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी स्वप्नील होरे, संकेत राजगुरू, गणेश मुदगडे, मोहित हरीणखेडे, रोहित घुले, शुभम कराळे, ओंकार गावडे आणि सामाजिक तरुण कार्यकर्ते योगेश जाधव आणि भोलेनाथ जोगदंड, प्रशांत बनसोडे उपस्थित होते.