पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारणे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. आता महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील आणि महायुतीचे श्रीरंग बारणे असा सामना होणार आहे.
शिवसेनेचे उमेदवार खालील प्रमाणे..
बुलढाणा – प्रतापराव जाधव, हिंगोली – हेमंत पाटील, मावळ – श्रीरंग बारणे, रामटेक – राजू पारवे, हातकणंगले – धैर्यशील माने, दक्षिण- मध्य मुंबई – राहुल शेवाळे, कोल्हापूर – संजय मंडलिक, शिर्डी – सदाशिव लोखंडे.