पिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (१० एप्रिल) स्नेहमेळावा आणि पानसुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अनेक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून दिशा सोशल फाऊंडेशनची ओळख आहे. गेल्या १८ वर्षांच्या दिशाच्या प्रवासाचे शहरवासीय साक्षीदार आहेत. दिशाच्या वतीने आतापर्यंत अनेक समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुढील काळातही अशाच भरीव उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संस्थेच्या कार्यासाठी प्रोत्साहन मिळावे, जाणकारांशी भेटीगाठी घेऊन साधकबाधक चर्चा व्हावी, त्यांच्याकडून मार्गदर्शन व्हावे, या हेतूने वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्नेहमेळावा आणि पानसुपारी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group