पिंपरी (Pclive7.com):- रमजान ईद निमित्त चिंचवड वाहतुक विभाग हद्दीतील चाफेकर चौक येथील ईदगाह मैदान येथे नमाज पठण करण्याकरीता मोठ्या प्रमाणात नागरीक येतात. त्यामुळे ईदगाह मैदानाकडे जाणारी व येणारी वाहतुक पर्यायी रस्त्याने वळविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे.
शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरिता यापुर्वी काही निर्बंध असतील ते रद्द करण्यात येत असुन खालील प्रमाणे तात्पुरते स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
चिंचवड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतुकीत ‘हे’ बदल..
०१) मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
# पर्यायी मार्ग १:- सदर मार्गावरील वाहतुक एसकेएफ कंपनीकडून डावे बाजूस वळुन अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
०२) चाफेकर चौक ते मरीआई माता मंदिर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
# पर्यायी मार्ग १:- सदर मार्गावरील वाहतुक ही चाफेकर चौक जुना जकात नाका कडुन उजवे बाजुस वळून सेव्हन ऑरेंज हॉस्पीटल मार्गे इच्छित स्थळी जातील.
# पर्यायी मार्ग २:- सदर मार्गावरील वाहतुक ही चाफेकर चौक कडुन उजवे बाजुस वळुन अंहिसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
०३) बिजलीनगर, हनुमान मंदिर वेताळ नगर ते चाफेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
# सदर मार्गावरील वाहतुक ही हनुमान मंदिर येथून डावीकडे वळून मरीआई माता मंदिर किंवा सेव्हन ऑरेंज हॉस्पीटल कडुन इच्छित स्थळी जातील.
तरी वरील नमुद मार्गावर दि.११/०४/२०२४ रोजी (एक दिवस पुढे मागे चंद्र दर्शनानुसार) सकाळी ०५.०० ते १२.०० वा. दरम्यान आवश्यकतेनुसार (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत वाहतुक बदल करण्यात येत असुन नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक विभाग तर्फे करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group