पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्पा लगतची जागा शिवजयंती उत्सव व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सवासाठी रहावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर सातत्याने पाठपुरावा करत होते. संबंधित जागेचा ताबा बांधकाम व्यवसायिक आज (दि.१०) घेणार होते. त्याला विरोध दर्शवण्यासाठी मारुती भापकर आज आंदोलन करणार होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी भापकर यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले असून नजरकैद केली आहे.
याबाबत Pclive7.com ला माहिती देताना मारुती भापकर म्हणाले की, भक्ती शक्ती समुह शिल्पालगची शिवजयंती उत्सव व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या जागेबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात पीएमआरडीए प्रशासन व संबंधित बांधकाम व्यवसायिक या जागेचा ताबा आज बुधवार दि.१०/०४/२०२४ रोजी सकाळी ११ वा घेणार आहेत, ही माहिती रात्री मला कळाली. भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज सकाळी आम्ही तेथे जाऊन लोकशाही पद्धतीने सनशीर मार्गाने, भारतीय संविधानाचा आदर करून आंदोलन करणार होतो.

तसेच मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रतिनिधींसमोर पीएमआरडीए प्रशासनाने भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती बाबत मा. उच्च न्यायालयात दिलेल्या चुकीच्या प्रतिज्ञापत्राबाबत व या जागेबाबत आम्हाला आमची भूमिका मांडायची होती. मात्र आज सकाळी ५.४५ वाजल्यापासून पोलीस अधिकारी व कर्मचारी आमच्या दारात दाखल झाले. तसेच मला पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जात आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.





















Join Our Whatsapp Group