पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- मनसे- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या (दि.०१ मंगळवारी) पिंपरी येथे जाहीर सभा घेणार आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील मैदानावर संध्याकाळी पाच वाजता आठवले यांची सभा होणार आहे. या सभेला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
आठवले यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे व शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर तसेच रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.























Join Our Whatsapp Group