पिंपरी (Pclive7.com):- काल सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत लोणावळा परिसरात तब्बल ३७५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे थेरगाव येथील केजूबाई बंधारा, पुनावळे येथील बंधारे ओसंडून वाहत आहेत. पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली असून चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरात पाण्यात गेले आहे.

कालपासून पावसाची संतधार सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण ७० टक्क्यांपर्यंत भरले आहे. शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत. शहराच्या विविध भागात पाणीच पाणी झाले आहे. पवना नदीतील पाण्याच्या पातळीत जोरदार वाढ होत आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.
थेरगाव येथील केजूबाई बंधारा तुडूंब भरून वाहू लागला आहे. तसेच पुनावळे येथील बंधाराही ओसांडून वाहत आहे. त्यामुळे चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदीर अर्धे पाण्यात गेले आहे. कालपासून संततधार सुरू असल्यामुळे पाणी शिरले असून परिसरातील नागरिक हे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.






















Join Our Whatsapp Group