पिंपरी (Pclive7.com):- अंध असूनही स्वतःच्या पायावर जगण्याची धडपड करणाऱ्या नवदांपत्यास संसारोपयोगी साहित्य देऊन पिंपरी चिंचवड शहर व्यापारी सेनेचे शहरप्रमुख युवराज दाखले यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला.
निगडी ओटास्कीम परिसरात राहणाऱ्या कांतीलाल पावरा व त्यांची पत्नी रूपाली पावरा हे दोघेही अंध आहेत. त्यांनी कोणत्याही संस्थेचा किंवा अंधशाळेचा आश्रय न घेता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा धाडसी निर्णय घेतला. परंतु हे करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातच स्वतःचा नवीन संसार उभा करताना त्यांना कोणाच्यातरी सहकार्याची आवश्यकता होती. अनेक राजकीय नेत्यांच्या कार्यालयात जाऊनही त्यांना आश्वासनांव्यतिरिक्त काही मिळाले नाही, अशी खंत पावरा दांपत्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शिव व्यापारी सेनेचे शहरप्रमुख युवराज दाखले यांना पावरा दांपत्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ संपर्क साधून सहकार्य करण्याचे औदार्य दाखवले. त्यानुसार या नवदांपत्यास संसारासाठी लागणारी गॅस सिलेंडर व शेगडी तात्काळ उपलब्ध करून दिली.
यावेळी बोलताना दाखले म्हणाले की, पावरा पती-पत्नी हे दोघे अंध असूनही त्यांची जगण्याची धडपड ही जगासाठी खरा आदर्श गोष्ट आहे. आज जागतिक महिला दिन व याच दिवशी एका अंध बहिणीला जर त्रास सहन करावा लागत असेल तर सोशल मीडियावर फक्त शाब्दिक शुभेच्छांचे नाटक का करायचे ? या विचारांनीच या नवदांपत्यास एक भावाची ओवाळणी म्हणून आम्ही हे सांसारिक साहित्य दिले आहे. यासाठी हनुमंत तापकीर प्रतिष्ठानचे विनोद तापकीर यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला मिळाले. यापुढेही आम्ही या दांपत्याच्या पाठीशी आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
यावेळी निलेश तापकीर, शिवव्यापारीसेना उपशहरप्रमुख गणेश आहेर,गोरख पाटील,अविनाश कदम, निखिल जाधव, गणेश आहेर, रोहन जाधव, सुनील खडाकडे, आतिष कांबळे, प्रवीण शेळके, रविकिरण घटकार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group