पिंपरी (Pclive7.com):- ‘फेम इंडिया’ या संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट संसदीय कार्यासाठी दिला जाणारा यंदाचा ‘श्रेष्ठ सांसद अवार्ड’ पुरस्कार हा खासदार सुप्रियाताई सुळे यांना देण्यात आला. ताईंचा ‘श्रेष्ठ सांसद अवार्ड’ ने सन्मान होणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब अाहे असे गौरव उद्गार पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी काढले आहेत.
अमित बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्वतःचे कर्तृत्व हे सिध्द करण्यासाठी मुळातच अंगात धमक असावी लागते. आणि ही धमक सुप्रियाताईंनी आपल्या कर्तृत्वाने दाखवुन दिली आहे. महिलांचे, युवतींचे संघटन करत ताईंनी या माध्यमातून एक महत्वपुर्ण चळवळ उभी केली. त्यामुळे सध्या युवती-महिलांमध्ये सामाजिक बदलाचे वारे वाहत आहेत. जनतेने दाखविलेला विश्वास आणि त्यातून निवडून आलेल्या सुप्रियाताईंनी नेहमीच आपल्याकडे असणा-या खासदार पदाचा योग्य उपयोग हा जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठीच केला, त्यात महिलांचे विवीध प्रश्न, अन्याय-अत्याचार, हुंडाबळी, स्त्रीभ्रुणहत्या अशा प्रकारच्या अनेक समस्यांना हात घालत त्यावर आवाज उठवत, ताईंनी महिलांचे प्रश्न शासना समोर मांडत त्यावर तोडगा काढण्यासाठी दिलेला लढा कौतुकास्पद आहे. लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सावलीत वाढलेल्या सुप्रिया ह्या सह्याद्रि कन्येचा ‘श्रेष्ठ सांसद अवार्ड’ ने सन्मान होणे, हि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.असे बच्छाव यांनी म्हटले आहे.