पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी येथे टायरच्या गोदामाला दुपारी भीषण आग लागली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कुदळवाडी येथील टायरच्या गोदामाला आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत तरी आगीत कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर, राहटणी, प्राधिकरण, भोसरी, एमआयडीसी विभागाचे १० ते १५ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुदळवाडी परिसरात अशा आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. या ठिकाणी अनेक भंगाराची दुकाने असल्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येते.






















Join Our Whatsapp Group