पिंपरी (Pclive7.com):- पत्नीने पैसे मागितल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या जन्मदात्या बापानेच आपल्या चार महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरी येथे घडली.
दत्ता अनिल देशमुख (वय ३४, रा. भारतनगर पिंपरी) असे अटक केलेल्या बापाचे नाव आहे. शुभांगी दत्ता देशमुख (वय २२ रा. लक्ष्मी हॉल, आंबेडकर नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आयुष दत्ता देशमुख (वय ४ महिने) असं जखमी बाळाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.३०) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास शुभांगी यांनी आपले पती दत्ता यांच्याकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. मात्र दारू पिण्यासाठी पैसे हवे असल्याने पतीने पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून पती पत्नीमध्ये भांडण झाले.
चिडलेल्या पतीने पत्नीच्या हातात असलेल्या मुलाला हिसकावून जमिनीवर आपटून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी कासारवाडी,पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते संग्राम घाटविसावे, संकेत भोसले, अजिंक्य भोसले, गणेश रोकडे यांनी तात्काळ मदत केली. त्या बाळावर वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू करण्यास मदत केली. सध्या त्या बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रामदास मुंढे करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group