पिंपरी (Pclive7.com):- मनोरुग्ण मुलाने आईच्या डोळ्यांवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली. दोन दिवसांपूर्वी झीलेली ही घटना आज समोर आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, भुपेंद्र विजय सावंत (वय ३५) असे या मनोरुग्ण मुलाचे नाव आहे. तर सुमन विजय सावंत (वय ७५, रा. गुरुद्वाराजवळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी झालेल्या आईचे नाव आहे. आजारी भुपेंद्रला आईने औषधाच्या गोळ्या खायला आग्रह धरल्याने तो चिडला. त्यामुळे त्याने थेट आपल्या आईवरच हल्ला चढवला. सुमन यांच्या दोन्ही डोळ्यावर भुपेंद्रने वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुमन सावंत या मुलगा भुपेंद्र यांच्यासह घरात एकट्याच होत्या. शनिवारी दुपारी त्यांनी मुलाला गोळ्या खाण्याचा आग्रह केला. त्यानंतर चिडलेल्या भुपेंद्रने अचानक आईवर चाकूने हल्ला चढवला. यात सुमन यांच्या डोळ्यात खोलवर इजा झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपासून भुपेंद्रवर येरवडा येथील मनोरुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकतेच त्याला रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. भुपेंद्र नेहमीच आई-वडिलांना मारहाण करीत होता. तो दोन-तीन दिवस घराबाहेर भटकत रहायचा. दरम्यान, आईवर चाकू हल्ला केल्यानतंर तो फरार झाला आहे. त्याचे वडिल मुंबईला कामावर गेले असल्याने, शेजारच्या लोकांनी सुमन यांना वायसीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.






















Join Our Whatsapp Group