वडगाव (Pclive7.com):- वडगाव मावळ येथे अशोक लेलैंड कंपनीच्या एवायएल मोटर्स या अधिकृत सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न झाले. उद्योजक नंदकुमार भोंडवे यांच्या हस्ते या सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती नितीन लांडगे, माजी नगरसेवक अमित गावडे, अशोक लेलैंड कंपनीचे अधिकारी सचिन बोंडे, सोहम हेब्बाळकर, सुनील ढोरे, ज्ञानेश नवले, जयनाथ काटे, अनिल नखाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

एवायएल मोटर्सचे संचालक अभय लायगुडे,आशिष लायगुडे, हर्षवर्धन लायगुडे यांनी उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

एवायएल मोटर्स हे महाराष्ट्रातील नंबर १ चे अशोक लेलैंड कंपनीचे अधिकृत सेवा केंद्र असून हेवी कमर्शियल व्हेईकल, व्यावसायिक वाहन, ट्रक, बस, डंपर इत्यादींची सर्व्हिसिंगची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणे या सर्व्हिस सेंटरमध्ये उपलब्ध असून ओरिजनल स्पेअर पार्ट येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

तसेच सर्व वाहनांची दुरुस्ती कुशल व तज्ज्ञ कामगारांकडून केली जाणार आहे. २४x७ ब्रेकडाऊनची व्यवस्था देखील इथे करण्यात आली आहे. या कंपनीमध्ये ड्रायव्हरसाठी रेस्ट रूम तसेच कस्टमरसाठी एसी लाउंज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ए वाय एल मोटर्स..
गट क्र.227, माळीनगर, जुना पुना मुंबई महामार्ग, वडगाव मावळ, पुणे 412 106.
फोन नं. + 91 9067 411116
+91 9067 611114























Join Our Whatsapp Group