पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर-रहाटणी येथे नगरसेविका निर्मलाताई कुटे सोशल फाऊंडेशन व लोकमान्य हास्य क्लबच्या वतीने आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी (दिंडी) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात प्लास्टिक बंदी व पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली.
या दिंडी सोहळ्याला नगरसेविका निर्मलाताई कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, सुभाष कुंजीर, संजय कुटे, विजय पाटील, राकेश भास्कर, प्रमोद कुंजीर, हास्यक्लबचे संस्थापक सुभाष देसाई, समन्वयक मिणया मिरासे, शाखाप्रमुख दीपक मिरासे, अनंतवार ताई, धोंड्डप्पा कडते, रमेश वाणी, भागवत झोपे, विलास नगरकर व हास्य क्लब चे सर्व शाखा प्रमुख उपस्थित होते.
या दिंडी सोहळ्याचे पूजन निर्मलाताई कुटे व संजय कुटे यांच्या हस्ते करुन विठ्ठल नामाच्या गजरामधे दिंडीची सुरूवात कोकणे चौक येथे करण्यात आली. त्यानंतर या सोहळ्याची सांगता पिंपळे सौदागर येथील विठ्ठल मंदिरामध्ये करण्यात आली. यावेळी बाल वारकऱ्यांनी अभंग व नृत्य सादर करत प्लास्टिक बंदी चा संदेश दिला.
यावेळी नगरसेविका निर्मला कुटे म्हणाल्या की, या दिंडी सोहळ्या मार्फत नागरिकांना निर्मल दिंडी, निर्मल भारत, निर्मल परिसर, झाडे लावा-झाडे जगवा असे संदेश देऊन प्रदुषणाविषयी जनजागृती करणे हा उद्देश होता.






















Join Our Whatsapp Group