
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या ओपन टी-ट्वेंटी पिंपरी चिंचवड करंडक अंतर क्लब स्पर्धेचे उद्घाटन असोसिएशनचे उपाध्यक्ष व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) अध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष वसंत कोकणे, सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, मुकेश गुजराती व फोर स्टार क्रिकेट ग्राउंडचे मालक विकास डांगे व धनराज मगनानी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री योगेश बहल म्हणाले की, ही स्पर्धा फक्त पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंसाठी असल्याने या शहरातील नवोदित खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची चांगली संधी मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार होतील. या शहराचे तसेच देशाचे नाव उज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच या स्पर्धेमधून चांगल्या खेळाडूंना पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन खजिनदार संजय शिंदे यांनी केले, तर प्रास्ताविक सचिव राजू कोतवाल आभार प्रदर्शन वसंत कोकणे यांनी केले.

उद्घाटन प्रसंगी झालेल्या सामन्यांमध्ये हे जे एस एस् एफ yellow संघाने पिंपरी चिंचवड पालिका संघाचा १७० धावांनी पराभव केला.
धावफलक –
एस जे एस एफ (yellow) – २० षटकात ५ बाद २२८ धावा – रोमित जोशी ७१
केतन गायकवाड ७२
रुद्र पटेल 27
गणेश अंकुशे २२
राहुल चावरिया ३/२६
विजयी विरुद्ध पिंपरी चिंचवड महानगरपालिका १९ षटकात सर्व बाद ५४ धावा
सचिन लोणे १८
कुलदीप नायडू ४/८
ललित सोनवणे २/८
सामनावीर रोमीत जोशी
























Join Our Whatsapp Group