
पिंपरी (Pclive7.com):- निवडणूक आयोगाने प्रभागात जाऊन मतदार याद्या बनवणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. त्यामुळं पिंपरी चिंचवडमधील प्रारुप मदातर याद्यांमध्ये घोळ झाला, असा आरोप सत्ताधारी भाजपचे आमदार अमित गोरेखे यांनी केला आहे.

अशा कारभारामुळं विरोधक निवडणूक आयोगावर वेळोवेळी आक्षेप घेतात का? असा प्रश्न विचारला असता, निवडणूक आयोगाने तंतोतंत काम करावं, अशी अपेक्षा गोरेखेंनी व्यक्त केली आहे. आता निवडणूक आयोगाकडे वेळ कमी आहे, त्यांनी लवकरात लवकर या त्रुटी संपवाव्या अशी मागणी गोरेखे यांनी केली आहे.

या आधी महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यात आता भाजपची ही भर पडली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता या तक्रारी कशा पद्धतीने सोडवणार हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


























Join Our Whatsapp Group