पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा दिनेश यादव यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तुळजाईनगर, नेवाळेवस्ती परिसरात आयोजित ‘घर टू घर’ संवाद उपक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. या संवादातून महिलांनी निशा यादव यांच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी महिलांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात प्रभावी महिला प्रतिनिधित्व व्हावे, तसेच प्रभागातील महिलांचे प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. मनपा कौशल्यम लाईटहाऊस उपक्रमाच्या माध्यमातून युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

भाजपा नेते व आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील आणि नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला जाईल, अशी ग्वाही निशा यादव यांनी दिली.

घर टू घर संवाद दरम्यान घरोघरी पत्रक वाटप करण्यात आले. माता–भगिनींनी प्रेमळ औक्षण केले, तर ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले. तरुणांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत प्रचाराला बळ दिले. यावेळी महिलांनी “प्रभागाच्या विकासासाठी निशाताईंना निवडून देणार” अशी ठाम ग्वाही दिली.
नागरिकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. महिलांचे सक्षमीकरण, युवतींना संधी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य राहील.”– निशा दिनेश यादवअध्यक्षा, इंद्रायणी महिला प्रतिष्ठान






















Join Our Whatsapp Group