पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक अजित पवार ही लढणार आहेत. शरद पवार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. प्रभाग क्रमांक २५ मधून त्यांनी उमेदवारी अर्ज ही दाखल केला आहे.

हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. अजित पोपट पवार हे प्रभाग क्रमांक २५ मधून ड या जागेसाठी स्वतःचं नशीब अजमावणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळाला तर ते अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असू शकतात.

पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रभाग क्रमांक २५ मधून अर्ज दाखलेले अजित पवार या दोघांच्या नावात साधर्म्य आहे. त्यामुळे अजित पवार पिंपरी चिंचवडची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

























Join Our Whatsapp Group