भोसरी (Pclive7.com):- आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ (गवळीनगर) येथे भाजप–आरपीआय महायुतीच्या वतीने विजयी प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे. दुर्गामाता मंडळ, चक्रपाणी वसाहत व सहकार कॉलनी परिसरात महायुतीच्या उमेदवारांनी प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेऊन प्रचाराला वेग दिला आहे.

भाजप–आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. जालिंदर किसन शिंदे, सौ. अनुराधा देविदास गोफणे, श्री. सागर बाबासाहेब गवळी आणि सौ. कविता भोंगाळे यांनी आज या परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा समजून घेत प्रभागाच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी ठोस उपाययोजनांचे आश्वासन देण्यात आले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी भाजप–आरपीआय महायुती कटिबद्ध असून, विकासाभिमुख धोरणांमुळे प्रभागाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. “विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून पुन्हा भाजपचा निर्धार” या संदेशासह प्रभाग क्रमांक ५ मधील सर्व मतदारांनी भाजप–आरपीआय महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group