पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज (दि.१०) पिंपरीतील प्रभाग क्रमांक २१ मध्ये भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले. या रोड शोमुळे संपूर्ण परिसर भाजप व आरपीआय (आठवले) युतीमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल परिसर, अशोक थिएटर आदी भागांतून हा रोड शो मोठ्या उत्साहात पार पडला. प्रभाग क्रमांक २१ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार उषाताई वाघेरे, मोनिकाताई निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी यांच्या प्रचारार्थ या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते.
या रोड श़ोला माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी उपमहापौर अमर मुलचंदाणी, युवा नेते बबलू सोनकर, यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. “विजयभव”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. शगुन चौक येथून रोड शोची सुरुवात होऊन साई चौक, साई स्टील, अशोक टॉकीज, महाराष्ट्र विद्यालय, गंगवा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवी काळेवाडी पूल, जमतानी चौक आणि मिलिंद नगर या मार्गांवरून मार्गक्रमण करत मोठ्या जल्लोषात रोड शोचा समारोप झाला.
या भव्य रोड शोमुळे भाजप–आरपीआय (आठवले) युतीचे प्रभावी शक्तीप्रदर्शन झाले असून, प्रभागातील चारही उमेदवारांची निवडणुकीतील बाजू अधिक भक्कम झाल्याचे राजकीय निरीक्षकांकडून सांगितले जात आहे.





















Join Our Whatsapp Group