पिंपळे सौदागर (Pclive7.com):- रहाटणी परिसरातील प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपाने प्रचारात मोठी आघाडी घेतली असून मतदारांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सोसायटीधारकांसह स्थानिक नागरिकांकडून भाजप–आरपीआय (आठवले) महायुतीच्या चारही उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. येत्या निवडणुकीत चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.

प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी येथे भाजप–आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार शत्रुघ्न काटे, संदेश काटे, अनिता काटे आणि कुंदा भिसे यांचा होम टू होम प्रचार जोरात सुरू आहे. उमेदवार थेट मतदारांच्या घरी जाऊन संवाद साधत असून नागरिकांच्या समस्या, मूलभूत प्रश्न आणि अडचणी जाणून घेत आहेत.

नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांकडून दिले जात आहे. या सकारात्मक संवादामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून परिसराच्या शाश्वत विकासासाठी भाजप–आरपीआय महायुतीला साथ देण्याची तयारी मतदारांनी दर्शवली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २८ रहाटणी–पिंपळे सौदागरमध्ये भाजप–आरपीआय महायुतीच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार मतदार व्यक्त करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
























Join Our Whatsapp Group