पिंपरी (Pclive7.com):- कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा उल्लेख करीत देशातील शाळा, महाविद्यालयातून क्रिडा शिक्षणावर भर द्यावा, याकरिता लोकसभेच्या सरकारी विधेयका दरम्यान खासदार श्रीरंग बारणे यांनी सरकारचे लक्ष वेधले.
देशामधील पहिले राष्ट्रीय क्रीडा विश्व विद्यालय मणिपूर याठिकाणी होत आहे. याच अनुशंघाने झालेल्या चर्चेत खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेमध्ये सरकारचे लक्ष वेधले. बारणे म्हणाले एक काळ असा होता की मुलांना घराबाहेर क्रीडांगण उपलब्ध होते व मुले विविध खेळ खेळत होती व खेळाविषयी आवड निर्माण होती. पण आज सोशल मिडीयाच्या जमान्यामध्ये मुले मोबाईल वरती खेळ खेळत असल्याने सोशल मिडीयाचा वाढता वापर हा मुलांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी घातक आहे. महाविद्यालयाच्या बाहेर १० पैकी ८ मुले मोबाईल वरती वेळ वाया घालवत असतात हे चित्र पहावयास मिळते. केंद्र व राज्य शासनाने शालेय जीवनापासून महाविद्यालयापर्यंत क्रीडा क्षेत्राला महत्व देवून अधिक अधिक सोयी पुरविणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने केवळ २००० कोटींचे बजेट क्रीडा साठी ठेवले असून ते खूप कमी आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूने भाग घेतल्यानंतर त्याला सरकारी नोकरीची हमी देण्यात यावी तरच त्याचे मानसिक मनोदय वाढेल व तो खेळात रमेल.
खासदार बारणे यांनी कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा उल्लेख करून देशाला कुस्तीमधील पहिले ब्रांज पदक कोल्हापूरच्या मातीतील मराठी कुस्तीगीर असणाऱ्या खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले होते. परंतु नंतर अशा खेळाडूंकडे शासनाने दुर्लक्ष केले. आज देखील अनेक खेळाडू चांगले असून आर्थिक परस्थिती मुळे उद्दिष्ठ गाठू शकत नाहीत. खेळासारख्या क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे तसेच वशिलेबाजीमुळे अनेक चांगल्या खेळाडूंची निवड होत नाही. तो एक प्रकारे खेळाडू वरती मोठया प्रमाणावर अन्याय होतो त्यामुळे चांगला खेळाडू खचला जातो व खेळापासून दूर जातो. आज देखील देशाच्या ग्रामीण भागात अनेक चांगले खेळाडू आहेत. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष होते. देश पातळीवरती चांगले प्रशिक्षक निर्माण करण्याची आवश्यकता असून त्या माध्यमातून तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पातळीपर्यंत स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून खेळाडू घडविले जातील आणि त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद सरकारच्या वतीने केली पाहिजे.
अनेक कंपनीचे सी.एस.आर.फंड देशाच्या योजनांसाठी वापरले जातात त्यातील काही सी.एस.आर.फंड क्रीडा क्षेत्रास वापरण्यास मंजुरी मिळाल्यास खेळला प्रोत्साहन मिळेल व नवीन खेळाडू निर्माण होतील. अनेक चांगले खेळाडू आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीकडे मदत मागण्यासाठी येतात परंतु शासकीय निर्बंधामुळे त्यांना मदत करू शकत नाही तरी खासदार निधी सारख्या आर्थिक व्यवस्थेतून खेळाडूंना मदत मिळावी यासाठी कायदा सुधारणा करण्याचे आवश्यक असल्याचेही खासदार बारणे यावेळी म्हणाले. क्रिडामंत्री कर्णल राजवर्धन राठोड यांचा उल्लेख करीत बारणे म्हणाले देशाला खऱ्या अर्थाने क्रिडा मंत्री मिळाले आहे की ज्यांना क्रिडा क्षेत्रा विषयी प्रेम व आस्था असून त्यांनी ऑलम्पीक स्पर्धेत नेमबाजीत देशाला अनेक सुवर्णपदक मिळवूण दिले आहे. त्यांच्याकडून देशवासियांच्या क्रिडाक्षेत्राविषयी व खेळाडू घडवण्या विषयी अनेक अपेक्षा आहेत. मणिपुर येथे राष्ट्रीय क्रिडा विश्वविद्यालय होत असून यातून अनेक खेळाडू घडतील. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातही अशा प्रकारचे विश्वविद्यालय सुरू करण्याची मागणी केल्याचे बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.





















Join Our Whatsapp Group