पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी पक्षातून पराभव होण्याच्या भीतीने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या आणि गेल्या चौदा वर्षात चौदा वेळाही विधानसभेत ‘तोंड’ न उघलेल्या मौनी आमदार म्हणून ख्याती असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराची पुरती वाट लावली आहे. राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने भाजपच्या हातात सत्ता दिली. परंतु, राष्ट्रवादीत सत्तेची चटक लागलेल्या याच नेत्यांच्या हातात सत्ता आल्याने पुन्हा पालिकेत भ्रष्टाचार अनागोंदी कारभार सुरु आहे. दीड वर्षाच्या कारभाराला जनता कंटाळली असून जगतापाचा ‘ताप’ पिंपरी चिंचवडकरांना होतोय. शहरातील पाणी, कचरा वाढती गुन्हेगारी या समस्यांना सर्वस्वी जबाबदार आमदार लक्ष्मण जगतापच असल्याचे, घणाघाती हल्लाबोल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे .
खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवार (दि.२१) रोजी सवांद खासदाराशी हा कार्यक्रम आकुर्डी येथे घेतला. या कार्यक्रमास मोठी गर्दी झाली होती अनेकांनी लेखी व तोंडी प्रश्न विचारले होते. त्यामध्ये असाही प्रश्न विचारला होता काय आपणांस २०१४ च्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी मदत केली नाही का यावर खासदार बारणे म्हणाले होते, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझे निवडणुकीत प्रामाणिक काम केले होते. त्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर सध्या पक्षात नव्याने आलेल्या काही इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी अतिक्रमण केले आहे बारणे यांचे हे शब्द जगताप यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी नेहमीच्या स्वभावाप्रमाणे मुळ मुद्याला बगल देत बारणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करत प्रसिद्धपत्रक काढले. त्यास बारणे यांनी आज सडेतोड प्रतिउत्तर दिले.
खासदार बारणे म्हणाले, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा पराभव जगताप यांच्या जिव्हारी लागला आहे. आपण पुन्हा राष्ट्रवादी पक्षात आमदार होणार नाही हे त्यांना पुरते कळून चुकल्याने ते मोदी लाटेत भाजपवाशी झाले. गेल्या चौदा वर्षात चौदा वेळाही विधान सभेत तोंड न उघडलेल्या जगताप यांच्या कडे मौनी आमदार म्हणून पहिले जाते. राष्ट्रवादी पक्षाच्या कारभारावर नाराज असलेल्या पिंपरी चिंचवडच्या जनतेला बदल हवा म्हणून भाजपला सत्ता दिली. समाजवादी काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसेचा सहारा घेऊन भाजपा वाशी झालेल्या या आमदारांना वाटते की हि सत्ता आपल्यामुळेच मिळाली आहे.
या भ्रमात या महाशयांनी पिंपरी चिंचवड शहराची पुरती वाट दीड वर्षात लावली आहे. एकेकाळी देशात अग्रगण्य असलेले पिंपरी चिंचवड शहर यांच्या दिशाहीन कर्तुत्वाने शेवटच्या क्रमांकवर फेकले गेले आहे. पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश होऊन ही कचरा, पाणी, रस्त्यावरील अतिक्रमण व वाहतूक समस्या यामुळे शहरातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. महापालिकेतील अनागोंदी कारभार एका मागून एक भ्रष्टाचाराची प्रकरने रोज बाहेर येत आहेत. संगनमत करून निविदा भरणे मर्जीतील ठेकेदारांना काम देणे. अधिका-यांना दम दाटी करणे शिव्या देणे धमकावणे हे प्रकार सर्रास चालू असून या महाशायाचे योगदान यामध्ये मोठे आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारीचे खरे प्रनेते हेच महाशय आमदार आहेत. हे पिंपरी चिंचवडच्या जनतेने ओळखले आहे. म्हणूच येणा-या निवडणुकीत वेगळ्यामार्गाने प्रसिद्धी मिळण्यासाठी जगताप उटसुट बेताल वक्तव्य करीत आहेत. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा खटाटोप सध्या चालू असून महापालिका ते राज्य व केंद्रात आपल्यामुळेच भाजपाची सत्ता आणल्याच्या तो-यात जगताप मिरवत आहेत. यांच्या या कारभाराला भाजपचे कार्यकर्तेच काय नेते देखील कंटाळले आहेत. जगताप यांनी शिवसेनेची चिंता करू नये शिवसेना संपविन्याची भाषा अनेकांनी केली ते संपले परंतु शिवसेनेचा भगवा डौलाने उभा आहे .शिवसेनेच्या वाटचालीसाठी पक्षप्रमुख खंबीर आहेत, असेही बारणे यांनी म्हटले आहे.
माझ्या कामाच्या प्रसिद्धीमुळे जगताप यांना स्वप्नातही मी दिसू लागलो आहे. त्यामुळे ते वाटेल ती मुक्ताफळे उधळू लागले आहेत. मी केलेले काम त्यांना दिसणार नाही. त्यांनी भ्रष्टाराची पट्टी डोळ्यावर ओढली आहे. ज्याची वृत्ती जालशी असल्याने त्यांना चांगले काम काय दिसणार व त्यांच्याकडून चांगल्या कामाची आशा पिंपरी चिंचवडकरांनी बाळगू नये. त्यांनी विधान सभेत कधीही तोंड उघले नाही; मात्र दुस-यावर टीका करुन त्यांना आनंद मिळतो. त्यांच्या या प्रवृतीस माझ्या लाख लाख शुभेच्छा असल्याचे खासदार बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group