पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज पिंपरी रेल्वे स्टेशन असे नामकरण करावी अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे. तिरोडा विधानसभेचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी याबाबत निवेदन देऊन मागणी केली आहे.
युवराज दाखले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलयं की, महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा भारताच्या इतिहासातील शौर्याचा साक्षिदार आहे. प्रामुख्याने छत्रपत्ती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या इतिहासाचा साक्षिदार आहे. छत्रपत्ती संभाजी महाराजांना पिंपरी चिंचवड शहरातून घेऊन जाऊन वढु या ठिकाणी अखेरच बलीदान दिल्याची इतिहासात नोंद आहे. म्हणूनच या ठिकाणी छत्रपत्ती संभाजी महाराज पिंपरी रेल्वे स्टेशन असे नामकरण केल्यास नविन पिढीला आदर्श मिळेल. तसेच त्यांच्या इतिहासाचे संवर्धन होईल. तरी स्वत: गांभीर्याने आदरपूर्वक दखल घेऊन तात्काळ नामकरणाचे आदेश द्यावेत अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे युवराज दाखले यांनी केली आहे