पिंपरी (Pclive7.com):- ११ डिसेंबरनंतर ५ विधानसभा राज्यांचा निकाल जाहीर झाल्यावर राज्यातील अनेक दिग्गज मंडळी, आमदार, खासदार पुन्हा राष्ट्रवादीत परत येतील, अशी बातमी एका वृत्तवाहिनीने नुकतीच प्रदर्शित केली असून त्यामध्ये भाजपचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे देखील नाव घेण्यात आले. या विषयाचे खंडन करताना आमदार लक्ष्मण जगताप यांनी ‘शेवटपर्यंत मी भाजप सोडणार नाही’ असे पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे महत्वाचे प्रश्न सुटले जावेत या उद्देशाने मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानुसार बहुदा शहरातील प्रश्न सुटले असून राहिलेले प्रश्न देखील सुटण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भाजपमध्ये मी समाधानी आहे. यापूर्वी देखील ‘मी भाजप सोडणार नाही’ असे प्रसारमाध्यमासमोर जाहीर केले होते. आणि आजही मी या भूमिखेवरती ठाम आहे. त्यामुळे एका वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आलेली बातमी हि केवळ अफवा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात जोरदार विकासाची कामे सुरु आहेत. प्रत्येक शासकीय योजना हि तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचत असून त्याचा लाभ सर्वाना होत आहे. त्यामुळे देशातील व राज्यातील जनता देखील भाजपच्या कामकाजावर समाधानी आहे.





















Join Our Whatsapp Group