पिंपरी (Pclive7.com):- पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील यादव समाजातील नागरिकांना पुढे नेण्यासाठी सर्वांनी संघटीत होणे आवश्यक आहे. सर्व समस्यांचे निराकरण करण्याची चावी शिक्षण आहे. त्यासाठी यादव समाजातील सर्वांनी मुलांना उच्च शिक्षण द्यावे. जेणेकरुन ते देश, आपल्या परिवारासाठी योगदान देऊ शकतील, असे मार्गदर्शन एलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक अध्यक्ष एल. आर. यादव यांनी केले. तसेच शाळा प्रवेश तसेच शाळा, महाविद्यालये सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रावेत येथे यादव महासंमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी यादव बोलत होते. मसुरीतील आयएएस ऍकॅडमीचे मधुसुदन स्वामी, उद्योजक हरिशचंद्र यादव, आर्डिनेन्स फॅक्टरीचे जनरल मॅनेजर डॉ. ओ पी. यादव, निवृत्त सैनिक एम. पी. यादव, भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश सचिव बबलू यादव, शिवसेनेचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार संतलाल यादव, रवी यादव, उद्योजक हंसराम यादव, रीना यादव, गीरीराज यादव, रामधनी यादव, राजेश यादव, रमेश यादव, श्रीनाथ यादव, बनवारी यादव,सुभाष यादव, एस. यादव, आर. सी. यादव, रामआधार यादव, अमृता यादव उपस्थित होते.
स्वामी मधुसुदन म्हणाले, यादवांचा जन्म दुसऱ्यांचे कल्याण करण्यासाठी झाला आहे. दुसऱ्यांना मदत करणे हा यादव समाजाचा पहिला धर्म आहे. तो प्रत्येक जण पाळत आहे.





















Join Our Whatsapp Group