पुणे (Pclive7.com):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून पुणे जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची प्रक्रिया दि.२५ मे २०२६ पासून सुरू होणार आहे.

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदान दि.१८ जून २०२६ रोजी होणार असून मतमोजणी दि.२२ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदार असणार आहेत. संबंधित सदस्यांची प्रारूप मतदार यादी दि. २१ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून ती कार्यालयीन वेळेत खालील ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे.

जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, पुणे कार्यालय
आयुक्त, पुणे महानगरपालिका कार्यालय
आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यालय
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे कार्यालय
मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट कार्यालय
मुख्य कार्यकारी अधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट कार्यालय
मुख्य कार्यकारी अधिकारी, देहू रोड कॅन्टोन्मेंट कार्यालय

पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींची कार्यालये दि.२१ ते २७ मे २०२६ या कालावधीत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक १७, नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ तसेच नावातील तपशील दुरुस्तीसाठी फॉर्म क्रमांक ८ भरून मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक-२०२६ (पुणे मतदारसंघ) यांच्याकडे सादर करता येणार आहेत.
संबंधित कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला, पुणे – ४११००१ असा असल्याचे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी कळविले आहे.




















Join Our Whatsapp Group